पुणे

दुचाकी चोरीच्या घटनांनी बारामतीकर चिंताग्रस्त

CD

बारामती, ता. ९ : गेल्या काही दिवसात बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरीचे प्रमाण लक्षणीय वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
विविध प्रकारच्या दुचाकी चोरणारी टोळीच बारामतीत सक्रिय झाल्याचा पोलिसांचा संशय असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. तपास सुरू असला तरी चोरटे मात्र दैनंदिन मोटारसायकलच्या चोऱ्या करत पोलिसांच्या हातावर तुरी देत असल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे.
राहुल कुमार जैन, साहिल मुलाणी, किरण चव्हाण, संजय पाटील, हर्षवर्धन चव्हाण यांच्यासह अनेकांच्या बुलेट, युनिकॉर्न, यामाहा यासह इतरही अनेक कंपन्यांच्या दुचाकी चोरट्यांनी हातोहात चोरून नेल्या आहेत.
दैनंदिन दुचाकीच्या चोरीच्या घटनांमुळे बारामतीकरांची चिंता मात्र वाढली आहे. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास सुरू केलेला असला तरी अजूनही दुचाकी चोरटे सापडत नसल्याने त्यात भरच पडत आहे. दोन ते तीन लाखांच्या दुचाकी चोरीला गेल्याने अनेक जण हवालदिल झाले असून पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून तपास करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस, नार्वेकर आणि जयंत पाटलांचा एकत्र विमान प्रवास

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT