पुणे

बारामतीत चोरट्यांकडून १० मोटारसायकली जप्त

CD

बारामती, ता. २ : येथील एमआयडीसी व परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी शोध लावला. दोन वेगवेगळ्या कारवायांत चार आरोपींविरुद्ध कारवाई करून चोरीच्या १० मोटारसायकली व दोन मोबाईल, असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला.
पियुष मनोजकुमार तुशबंड (वय २१, रा. खंडोबानगर, बारामती) यांची मोटारसायकल व दोन मोबाईल २७ ऑक्टोबर रोजी डायनामिक्स डेअरीसमोरून चोरीला गेले होते. या गुन्ह्याच्या तपासात इमरान फिरोज शेख, श्री उर्फ श्रीराज नवनाथ वाघंबरे, कुणाल विशाल भालेराव (रा. माळशिरस, सोलापूर), एक विधी संघर्षित बालक यांना अकलूज येथून तालुका अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकली व दोन मोबाईल (१ लाख ८५ हजार रुपये) जप्त केले.
तसेच, गणेश शिवा काळे (वय २९, रा. वरकुटे खुर्द, इंदापूर) व प्रज्वल प्रतापराव मुंडफुणे पाटील (वय २४, रा. महाळुंग, सोलापूर; सध्या निमगाव केतकी) यांनी चोरी केलेल्या सहा मोटारसायकली (२ लाख ५० हजार रुपये) जप्त केल्या. प्रभारी अधिकारी नारायण पवार, विक्रम पवार, श्रीरंग शिंदे व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुधीर काळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rising Stars Asia Cup साठी भारतीय संघाची घोषणा! तिलक वर्मा कर्णधार, तर अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशचाही समावेश

Narendra Modi: जागतिक ऊर्जा संकटाचा भारतावर प्रभाव का पडला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Pune Road Accident: शिरूरमध्ये भीषण अपघात! अष्टविनायक महामार्गावर मोटारीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; ओव्हरटेकचा प्रयत्न ठरला जीवघेणा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक; राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक, सुनील तटकरेंची माहिती

Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

SCROLL FOR NEXT