mp Supriya Sule sakal
पुणे

Supriya Sule : आमच्यात वैचारिक मतभेद, मनभेद नाहीत; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

माझ्यासोबत तुम्हाला आज जे दिसत आहेत ते कार्यकर्ते नाही तर माझ्या कुटुंबाचेच सदस्य आहेत, त्यामुळे यात काही राजकारण नाही.

मिलिंद संगई

बारामती - माझ्यासोबत तुम्हाला आज जे दिसत आहेत ते कार्यकर्ते नाही तर माझ्या कुटुंबाचेच सदस्य आहेत, त्यामुळे यात काही राजकारण नाही, आमचे वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत, आमचा वैचारिक लढा सुरुच असेल मात्र माझ्यासोबत असलेली माणसे ही कौटुंबिक आहेत, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

राष्ट्रवादीतील फूटीनंतर प्रथमच सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा दौरा केला. या मध्ये सांत्वन भेटींसह अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्याल व बारामती रेल्वे स्थानक व लगतचा रस्ता याला त्यांनी भेट दिली. या दौ-यादरम्यान नटराज नाट्य कला मंडळालाही त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी माझ्यासोबत असलेल्या व्यक्ती हा कौटुंबिक सदस्य म्हणून आलेल्या आहेत, त्याचा राजकारणाशी संबंध लावू नये, असे स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांचा फुटीनंतरचा बारामतीचा पहिलाच दौरा असल्याने त्यांच्यासमवेत कोण असणार या बाबत उत्सुकता होती. काही पदाधिकारी यात सहभागी झाले होते मात्र सुळे यांचा हा दौरा राजकीय नव्हता तर सांतत्वभेटीचा त्यात प्रमुख भाग होता, असे स्पष्ट करण्यात आले.

एन.डी. पाटील हे कायम शरद पवार यांच्या विरोधात होते. पाटील हे पवारसाहेबांच्या सख्ख्या बहिणीचे यजमान असूनही त्यांचे कायमच वैचारिक मतभेद राहिले, मात्र त्याचा कौटुंबिक पातळीवर कधीच फरक पडला नाही. कायम त्यांचे नातेसंबंध जिव्हाळ्याचे राहिले. राजकारण आणि कुटुंब हे वेगळे ठेवण्याइतपत पवार कुटुंबिय प्रगल्भ असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सर्वेक्षण अपेक्षित न आल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबविणे दुर्देवी असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

बारामतीत तुम्ही एकाकी पडल्याचे जाणवत आहे का...या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, बारामती हे माझे माहेर आहे, माझी कर्मभूमी आहे, लोक माझ्या बरोबर आहेत आणि राहतील, माझ इथल राजकारण समाजकारण आहे, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे नेहमी फक्त लोकसभेचच तिकीट मागितलेल आहे, लोकांची सेवा, शेतक-यांचा सन्मान व राज्याच्या स्वाभिमानासाठी मी राजकारणात आले. मी एक सेवक म्हणून कार्यरत आहे, लोकांनी दिलेल्या संधीबद्दल कायमच ऋणी राहीन.

राष्ट्रवादीत विचारात अंतर आल आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे काही पवार कुटुंब नाही, आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, वैयक्तिक मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात पवार कुटुंबिय एकत्र दिसू शकतील का प्रश्नावर त्यांनी पुन्हा वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत, असे उत्तर दिले. अजितदादांच्या मागे धावपळ आहे हे मी रोज पाहते आहे पण ते लवकरच बारामतीलाही येतील, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT