Baramati Municipal Sakal
पुणे

बारामती नगरपालिका नागरिकांकडून प्लॅस्टिकचा कचरा विकत घेणार

बारामती शहरातील प्लॅस्टिक निर्मूलनासाठी बारामती नगरपालिकेने अभिनव कल्पना शोधून काढली असून त्या मुळे प्लॅस्टिकमुक्त बारामतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.

मिलिंद संगई,

बारामती शहरातील प्लॅस्टिक निर्मूलनासाठी बारामती नगरपालिकेने अभिनव कल्पना शोधून काढली असून त्या मुळे प्लॅस्टिकमुक्त बारामतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.

बारामती - शहरातील प्लॅस्टिक निर्मूलनासाठी (Plastic Elimination) बारामती नगरपालिकेने (Baramati Municipal) अभिनव कल्पना शोधून काढली असून त्या मुळे प्लॅस्टिकमुक्त (Palsticfree) बारामतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल असा विश्वास नगरपालिका प्रशासनास वाटत आहे.

प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर कमी करुन लोकांना कापडी पिशव्यांची सवय लावण्यासाठी बारामती नगरपालिकेने आता प्लॅस्टिकचा कचरा थेट विकत घेण्याची योजना हाती घेतली आहे. बारामतीत पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा नगरपालिकेच्या वतीने लुको नावाची कंपनी संकलन करणार आहे.

ज्या प्लॅस्टिकच्या कच-यावर प्रक्रीया होऊ शकते असा कचरा दहा रुपये प्रति किलो या भावाने तर ज्या कच-यावर प्रक्रीया शक्य होत नाही असा कचरा तीन रुपये प्रति किलो या भावाने विकत घेतला जाणार आहे. गणेश मार्केट व पंचायत समितीनजिक अशा दोन संकलन केंद्राच्या माध्यमातून नगरपालिका प्लॅस्टिकचा कचरा थेट विकतच घेणार आहे. बारामतीकरांनी या पुढील काळात आपल्या दैनंदिन कच-यात प्लॅस्टिक व प्लॅस्टिकसदृश कचरा टाकू नये, तो संकलन केंद्रावर देऊन किलोप्रमाणे त्याचे पैसे घेऊन जाण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या प्लॅस्टिकच्या कच-याचे वर्गीकरण न करताच त्याची विल्हेवाट लावली जात आहे, या प्लॅस्टिकमुळे नदी, कालवा गटारांमध्ये अनेकदा घाण निर्माण होते, सूक्ष्म प्लॅस्टिक प्राण्यांच्या तसेच मानवी अन्नसाखळीत प्रवेश करु पाहत असल्याने ते अधिकच धोकादायक बनले आहे, या पार्श्वभूमीवर बारामती प्लॅस्टिकमुक्तीच्या दिशेने आता नगरपालिकेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.

बारामतीकरांनो हे करा.....

  • या पुढील काळात नेहमीच्या कच-यात प्लॅस्टिक टाकू नका

  • प्लॅस्टिक वर्गीकरणातील प्रत्येक गोष्ट वेगळी गोळा करा

  • या पुढे प्लॅस्टिक आणून देणा-यांना प्रतिकिलोनुसार परतावा मिळेल

  • कच-यातील प्लॅस्टिक टप्याटप्याने कमी करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे

  • प्लॅस्टिक फेकून न देता एकत्रित संकलित करुन ते नगरपालिकेकडे द्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली, असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

SCROLL FOR NEXT