Baramati Municipal corporation sakal
पुणे

बारामती नगरपालिका प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून उत्पन्न मिळविणार

बारामती नगरपालिकेने जवळपास 25 कोटी रुपये खर्चून सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारला असून आता पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प काम करीत आहे.

मिलिंद संगई,

बारामती नगरपालिकेने जवळपास 25 कोटी रुपये खर्चून सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारला असून आता पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प काम करीत आहे.

बारामती - येथील नगरपालिकेने (Municipal) आता अभिनव उपक्रम सुरु केला आहे. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Drainage Water Project) आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला असून प्रक्रीया केलेले पाणी विक्री (Water Selling) करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिकांना ही सुवर्णसंधी असून त्याचा लाभ व्यावसायिकांनी घ्यावा असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.

बारामती नगरपालिकेने जवळपास 25 कोटी रुपये खर्चून सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारला असून आता पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प काम करीत आहे. दैनंदिन साडेअकरा दशलक्ष लिटर्स इतक्या मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रीया करुन ते शुध्द केले जाते.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारणे अनिवार्य असून नगरपालिकेने हा प्रकल्प आता कार्यान्वित केला आहे. यात आजमितीस जवळपास 80 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रीया केली जात आहे. हे पाणी झाडांना देण्यासह बांधकामावर वापरले जाऊ शकते. त्या मुळे बांधकाम व्यावसायिकांसह इतर जेथे जेथे पाण्याची गरज भासेल त्यांना बाजारभावाहून कमी दराने हे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने बारामती नगरपालिकेने निविदा मागविल्या आहेत.

या शिवाय या प्रकल्पातून तयार होणारी स्लरी देखील शहरातील दुभाजाकांसह इतर ठिकाणच्या झाडांना घातली जात आहे. त्याचाही झाडे चांगली तरारतील व त्याचा फायदा होईल. दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने नगरपालिकेला बाराही महिने झाडांसह इतर स्वच्छतेच्या कामासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही.

प्रक्रीया होत असलेल्या पाण्याची सध्याची क्षमता इतकी प्रचंड आहे की नगरपालिकेला नाईलाजाने हे पाणी नदीत सोडून द्यावे लागत आहे, मात्र लवकरच या पाण्याची विक्री करुन नगरपालिका त्यातून उत्पन्न कमाविण्याच्या दिशेने प्रयत्न करते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'च्या समर्थनार्थ चंद्रकांतदादा, धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात आम्हीही मोर्चा काढू; आमदार शिवाजी पाटलांचा सतेज पाटील, शेट्टींना इशारा

IND A vs AFG A: ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचे दार ठोठावतोय... शतकानंतर आणखी एक दमदार खेळी, गौतम गंभीर देणार का संधी?

MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..

Vajreshwari Kund : वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे झरे धोक्यात! शंकर मंदिरासमोरील पवित्र कुंड पूर्णपणे कोरडे; भाविकांमध्ये तीव्र नाराजी, गेल्या 3 वर्षांपासून नेमकं काय घडतंय?

Gangapur farmers: गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा, 15 जूननंतर पेरणीचा सल्ला

SCROLL FOR NEXT