Baramati-Municipal
Baramati-Municipal 
पुणे

बारामती पालिकेत काम बंद आंदोलन

सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - येथील नगरपालिकेत बुधवारी एका नगरसेवकाने चुकीचे शब्द वापरत मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. यामुळे दुपारनंतर नगरपालिकेचे कामकाज विस्कळित झाले होते. 

एक अतिक्रमण काढण्याच्या विषयावरून सुरू झालेल्या या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. नगरसेवक समीर चव्हाण यांनी शहरातील एक अतिक्रमण काढण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत जाब विचारला, तेव्हा मुख्याधिकारी योगेश कडुसकर व समीर चव्हाण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, असे सूत्रांनी सांगितले. यात चव्हाण यांनी कडुसकर यांना एकाच अतिक्रमणाबाबत इतक्‍या तत्परतेने कारवाई का, इतर ठिकाणी नगरपालिका कारवाई का करत नाही, अशी विचारणा केल्यानंतर मुख्याधिकारी व चव्हाण यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी तेथून जाणे पसंत केले. निघून जाताना मुख्याधिकाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते असे काहींनी सांगितले. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना त्यांची बाजू समजून घेण्याबाबत वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नगरसेवक म्हणून मुख्याधिकाऱ्यांना एखाद्या कृतीबाबत विचारणा करणे हा अधिकार आहे, आपण कोणतीही अर्वाच्च भाषा वापरली नाही, मात्र अतिक्रमणाबाबत एकाच ठिकाणी कारवाई करायची व इतर ठिकाणी डोळेझाक करायची ही भूमिका योग्य नाही जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही भांडतो आहोत, असे समीर चव्हाण यांनी सांगितले.

अनेकांची मध्यस्थी अपयशी...
मुख्याधिकारी नगरपालिकेतून निघून गेल्याचे समजताच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू करत मुख्याधिकाऱ्यांना पाठिंबा दर्शविला. दरम्यान, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या दारात ठिय्या मांडला होता. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी यात प्रकरणी मध्यस्थीचा प्रयत्न सुरू ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT