baramati municipality employees saved lives of nine youths ganesh visarjan marathi news sakal
पुणे

Baramati News : बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नऊ तरूणांचा जीव वाचवला

तीनहत्ती चौका नजीक असलेल्या कालव्यावरील घाटाजवळ तरूण वाहून जात असताना फायरमन मोहन शिंदे यांनी धाडसाने त्या तरूणाचा जीव वाचवला

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहरातील माळावरच्या देवी जवळ निरा डावा कालव्यामध्ये गणेश विसर्जनाच्या वेळेस वाहून जाणाऱ्या आठ युवकांचे बारामती नगर परिषद अग्नीशमन विभागाचे फायरमन प्रदिप लालबिगे यांनी प्राण वाचविले. तीनहत्ती चौका नजीक असलेल्या कालव्यावरील घाटाजवळ तरूण वाहून जात असताना फायरमन मोहन शिंदे यांनी धाडसाने त्या तरूणाचा जीव वाचवला.

बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच अग्निशमन अधिकारी पद्मनाथ कुल्लरवार यांनी विसर्जनाच्या वेळेस नीरा डावा कालव्यामध्ये लोक वाहून जातील ही शक्यता लक्षात घेऊन जीव रक्षकांची नियुक्ती केली होती. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या वेळेस नीरा डावा कालव्यामध्ये अनेक जण पाण्यामध्ये घसरून पडतात.

त्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून नगरपालिकेने यंदा चोख उपाययोजना केली होती. नगरपालिका अग्निशमन दलाचे प्रदीप लालबिगे व मोहन लालबिगे यांनी नीरा डावा कालव्यात वाहून जाणाऱ्या जवळपास नऊ युवकांचे प्राण वाचवून मोठी कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT