Baramati Municipality is facing the economic crisis due to the corona  
पुणे

इकडे आड, तिकडे विहीर; बारामती नगरपालिकेची स्थिती!

मिलिंद संगई

बारामती : एकीकडे कोरोनाने लोकांवर कोसळलेले आर्थिक संकट व दुसरीकडे बारामती नगरपालिकेपुढे घरपट्टी, जागाभाडे, पाणीपट्टीची कोट्यवधींची वसूली कशी करायची याची चिंता असे चित्र सध्या दिसत आहे. नगरपालिकेकडे नगरपालिका निधीसाठी घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे या तिन्हीचा भरणा होणे गरजेचे असते. केवळ बारामतीच नव्हे तर राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये हेच चित्र कायम असल्याने आता नगरविकास विभागाने या बाबत काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज बोलून दाखवली जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदा मार्च महिन्यापासूनच कोरोनाचे संकट घोंघावू लागल्याने वसूलीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागाभाडे व इतर थकबाकीपोटी जवळपास 13 कोटी रुपये नगरपालिकेला येणे बाकी आहे. या रकमेतूनच शहरातील विविध विकासकामे नगरपालिका निधीतून केली जातात. 

यंदा मार्चपासून सातत्याने सुरु असलेले लॉकडाऊन, त्या मुळे व्यवसाय न होणे, बाजारात कोरोनाने आलेली मंदीची लाट, ग्राहकांची खरेदीसाठीची अनुत्सुकता या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना घरघर लागली आहे, काहींनी तर दुकानेच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिन्यांच्या कालावधीत व्यवसायाला काहीही उर्जितावस्था नसल्याने करभरणा कोठून करायचा हा दुकानदारांपुढील प्रश्न आहे. 

दरवर्षी बारामती नगरपालिकेला जागाभाडे, मालमत्ता कर, पाणीपट्टी या पोटी कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर करवाढीचे आकडेही वाढले होते. मार्चअखेरीस नगरपालिका वसूलीसाठी जोर लावत असते, यंदा मार्चमध्येच कोरोनाने लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे आणि हे संकट लांबतच गेल्याने नगरपालिकेलाही वसूलीसाठी काहीही करता येत नाही अशी स्थिती आहे. कोरोनाच्या संकटात वसूली कशी करायची हा प्रश्न नगरपालिका प्रशासनापुढे आहे.
 शरद पवार संतापले; 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!'

इकडे आड तिकडे विहीर....
वसूलीचा विषय म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशीच नगरपालिकेची स्थिती झाली आहे. वसूलीला जाणे शक्य नाही तर दुसरीकडे नगरपालिका निधीत रक्कमच जमा होत नसल्याने त्याचा फटका नगरपालिकेला बसणार अशी स्थिती आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

१२ चौकार, १३ षटकार! वैभव सूर्यवंशीच्या भीडूचे ३२ चेंडूंत शतक; राजस्थान रॉ़यल्सचा फलंदाज IPL 2027 मध्ये यशस्वी जैस्वालच्या जागी खेळणार?

Chhatrapati Sambhajinagar: १८ दिवसात २० छापे, कोट्यवधींचा माल जप्त; १४ जणांना अटक, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT