पुणे

Baramati Murder: बारामतीत दांपत्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक; संशयिताचे वय 21 वर्ष

स्वताः पोलिस अधीक्षकच काल बारामतीत असल्याने या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली केल्याने संशयित लगेचच ताब्यात आला. दिग्विजय हा ऑनलाईन ट्रेडींग करत असल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरिक्षक संतोष घोळवे करीत आहेत.

- मिलिंद संगई

Baramati Crime News: शहरातील खत्री पवार इस्टेटमध्ये शनिवारी (ता. 13) झालेल्या दांपत्यांच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी दिग्विजय गणेश झणझणे (वय 21, रा. खत्री पवार इस्टेट, जामदार रोड, बारामती) यास अटक केली आहे.

या प्रकरणी यश सचिन वाघोलीकर यांनी फिर्याद दिली. शनिवारी राहत्या घरात बांधकाम व्यावसायिक असलेले सचिन महालिंग वाघोलीकर (वय 48) व त्यांची पत्नी सारिका सचिन वाघोलीकर (वय 40) यांचा सकाळी साडेअकराच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करुन खून केला गेला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे आर्थिक कारणावरुन दिग्विजय गणेश झणझणे याने हा खून केला आहे. (baramati news)

दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी पोलिसही या घटनेनंतर चक्रावले होते. मात्र काही वेळातच पोलिसांनी हालचाली करुन दिग्विजय झणझणे याला ताब्यात घेतल्यानंतर या दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा झाला. (baramati city police station)

सचिन वाघोलीकर यांनी दिग्विजय याच्याकडून पैसे घेतले होते व ते परत करण्यास ते टाळाटाळ करत होते, त्या रागाच्या भरात दिग्विजयने घरात असलेल्या पती पत्नीवर हल्ला करत त्यांचा निर्घृण खून केला अशी प्राथमिक तपासात माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी नमूद केले.

स्वताः पोलिस अधीक्षकच काल बारामतीत असल्याने या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली केल्याने संशयित लगेचच ताब्यात आला. दिग्विजय हा ऑनलाईन ट्रेडींग करत असल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरिक्षक संतोष घोळवे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT