punepunw Crime News esakal
पुणे

Pune : आठ महिन्यापूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून

वडगाव निंबाळकर येथिल घटना

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आठ महिन्यानंतर उघडकीस आला.अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रोहित खोमणे, सागर चव्हाण, शिवदत्त सूर्यवंशी रा. वडगाव निंबाळकर ता बारामती अशी या खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये येथिल विवाहित तरूण बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांकडून पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखे कडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरु कऱण्यात आला होता.

बेपत्ता तरूणाचा मृतदेह लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिलेच्या प्रियकरासह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रियकराने तिच्या पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या या खून प्रकरणामुळे वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT