बारामती, ता. १८ : खूनप्रकरणात तब्बल ७२५ दिवसांपासून फरार असलेला संशयित अनिकेत संजय पवार (वय २०, रा. जगतापमळा, खंडोबानगर, बारामती) याला बारामती शहर पोलिसांनी माळावरची देवी परिसरातून अटक केली. याच गुन्ह्यातील न्यायालयीन वॉरंटवरील भोल्या ऊर्फ किशोर बापू भिसे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
बारामती शहर पोलिस ठाण्यात गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७) याच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल आहे. २१ ऑगस्ट २०२४ ला जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ गणेशवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. तपासात अनिकेत पवार याच्यासह इतरांचा यात सहभाग असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून पोलिस अनिकेत पवार याचा शोध घेत होते. पोलिस शिपाई अक्षय सिताप यांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने सापळा रचून अनिकेतला पकडले. पथकात यशवंत पवार, ज्ञानदेव क्षीरसागर, गिरीश नेवसे, सागर जामदार व विशाल शिंदे यांचा समावेश होता. किशोर भिसे हा न्यायालयीन तारखांना गैरहजर राहिल्याने त्याच्याविरुद्ध वॉरंट होते. पोलिस हवालदार टापरे यांच्या पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.