NCP and bjp party esakal
पुणे

Baramati Politics : बारामतीतील राजकीय वातावरण तापणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बारामतीत राष्ट्रवादी व भाजप शक्तीप्रदर्शन करणार.

मिलिंद संगई,

बारामती - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बारामतीत राष्ट्रवादी व भाजप शक्तीप्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, राम शिंदे, राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (ता. 24) बारामतीत हजेरी लावणार आहेत.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय असे नामकरण राज्य शासनाने केल्यानंतर गिरीश महाजन प्रथमच बारामतीत येत असल्याने त्यांचा सत्कार करण्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना रविवारी (ता. 25) पाचारण केले जाणार असून ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम जगताप, रवींद्र धंगेकर आदी उपस्थित राहणार आहेत. विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनही सिध्दरामय्या यांच्या बारामती भेटीकडे पाहिले जात आहे.

या निमित्ताने भाजप व राष्ट्रवादी परस्परांवर काय टीकास्त्र सोडणार या बाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्याचे या पूर्वीच जाहिर करुन त्या दृष्टीने व्यूहरचनाही सुरु केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वतीनेही भाजपवर टीकेची एकही संधी सोडली जात नाही. बारामतीत भाजप ताकद लावणार हा संदेश या निमित्ताने देण्याचाही एक प्रयत्न असेल.

आगामी काळात होणा-या नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीसह पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत ताकद लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

अजित पवार यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी सर्वच निवडणूकात विकास हाच मुद्दा प्रमुख असेल हे या पूर्वीच जाहिर केलेले आहे.

लोकसभा निवडणूकीत बारामतीत ताकद लावण्याच्या दृष्टीने बारामतीसह, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या सर्वच विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे.

बारामतीत भाजप व राष्ट्रवादी परस्परांवर काय बोलणार याकडेच आता महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

Dombivli Politics: 'तुम्ही एक घेणार तर आम्ही चार'; फोडाफोडीच्या वादावर भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार, आरोप-प्रत्यारोपांचा महापूर

शुक्रवारी शाळा बंद आंदोलन! शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा; शिक्षकांची नेमकी मागणी काय?

SCROLL FOR NEXT