बारामती, ता. १९ : बारामतीतील तांदूळवाडी येथे जुन्या रेल्वे पुलाखाली टाकून दिलेल्या एका नवजात बालिकेचे प्राण नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले. बुधवारी (ता. १९) सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहरातील तांदूळवाडी येथील जुन्या रेल्वे पुलाखाली सकाळी सव्वासहाच्या सुमारास एका नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज काही नागरिकांना आला. त्यांनी तत्काळ बारामती तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलिस कर्मचारी शाहरुख शेख यांना घटनास्थळी रवाना केले.
पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, एक जागरूक नागरिक त्या स्त्री अर्भकाला उचलून तिचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीने त्या चिमुकलीला ताब्यात घेऊन उपचारासाठी येथील महिला व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे अर्भकाचे प्राण वाचले असून, तिची प्रकृती सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी, पोटच्या गोळ्याचा त्याग करणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात पोलिस कर्मचारी शाहरुख शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्या अज्ञात मातेचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.