ajit pawar  sakal
पुणे

Baramati News : बारामतीत अजित पवारांचा स्वच्छता अभियानात सहभाग.

विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समाजाच्या अनेक स्तरातील नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवित एक तास स्वच्छता अभियानासाठी देऊ केला.

मिलिंद संगई, बारामती..

बारामती - शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक तारीख एक तास स्वच्छता अभियान या उपक्रमांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी बारामतीत रविवारी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.

अजित पवार यांनी रविवारी ( ता.1) शहरात स्वतः स्वच्छता अभियानात अनेक ठिकाणी कचरा उचलून खोरे हातात घेऊन गवत देखील स्वच्छ केले. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने सुनेत्रा पवार यांनी देखील स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. अजित पवार यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.

विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समाजाच्या अनेक स्तरातील नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवित एक तास स्वच्छता अभियानासाठी देऊ केला.

स्वच्छता पंधरवड्या निमित्त देशभरात आज स्वच्छतेसाठी एक तास हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत बारामतीत देखील विविध उपक्रमांचे आयोजन बारामती नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संस्था, संघटना तसेच शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व प्रतिनिधी यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: राहुल गांधींविरोधातील याचिकेवर CJI सूर्यकांत वकिलावर संतापले; अचानक सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद!

Tiger Shroff Firing: लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या! साबरमती जेलमधील ‘दो सौ खोली’ हलविले

Pune Graduate election counting latest update : पुणे पदवीधर मतदार संघातील पहिली अपडेट आली समोर, लिंबू, बिबवे आढळल्याने गोंधळ

गुलाल आपलाच! मतमोजणी सुरू होताच कराळे मास्तरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाले, ४०-४५ हजार मते मिळतील

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लोकशाही भवनात मतमोजणी सुरू; १४ टेबलवर १४ हजार मतपत्रिकांची मोजणी

SCROLL FOR NEXT