baramati sakal
पुणे

Baramati News : सराफ व्यावसायिकांनी पारदर्शक व चोख व्यवसाय करावा- सुरेंद्र मेहता

बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने सराफ व्यावसायिक, सुवर्णकार यांच्यासाठी 'आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा'

- मिलिंद संगई

बारामती - सराफ व्यावसायिकांनी व्यवसाय करताना चोख व पारदर्शक केला तर त्रास होत नाही. एखादा ग्राहक महिन्यात दहा लाखांहून अधिक उलाढाल करत असेल तर त्याची माहिती सरकारला कळविणे बंधनकारक असल्याची माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणिस सुरेंद्र मेहता यांनी दिली.

बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने सराफ व्यावसायिक, सुवर्णकार यांच्यासाठी 'आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा' (पीएमएलए) याविषयी प्रशिक्षण शिबिर, मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे शनिवारी (ता. 16) आयोजन केले गेले. त्या प्रसंगी मेहता बोलत होते. याप्रसंगी विजय लष्करे, संतोष बागडे, जयप्रकाश बेदरे, जे. बी. सराफ, किशोर शहा, श्यामसुंदर कुलथे, रुपाली शहाणे उपस्थित होते.

ते म्हणाले, 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या सराफ व्यावसायिकांनी नोडल ऑफिसर नेमावा. त्यापेक्षा छोटे व्यावसायिक आपल्या असोसिएशनला नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात. संशयास्पद बाबींची माहिती सरकारला द्यायला हवी.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष हरीश केवलरामाणी म्हणाले, सोन्यावर अथवा चांदीवर एचयुआयडी बंधनकारक केला तरी आपण त्या दृष्टीने अधिच मानसिक व आर्थिक तयारीत रहावे. नव्या बदलाना सामोरे जावे.

राष्ट्रीय संचालक विजय अग्रवाल म्हणाले, सोन्यावर एचयुआयडी आला आहे तसा चांदीवर भविष्यात येऊ शकतो. सराफ व्यावसायिकांनी त्या दृष्टीने तयारीत असले पाहिजे.

बारामती असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल सावळे यांनी सूत्रसंचालन केले, सुधीर पोतदार यांनी आभार मानले.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण आळंदीकर यांचा बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने किशोरकुमार शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक किरण अवचर, दिनेश तायडे, प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांचाही सन्मान करण्यात आला.

- महिलांना संधी दिली जाणार.....

बारामती तालुका सराफ असोसिएशनने यापुढे समिती निवडताना पन्नास टक्के महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला. अमृतराज माळेगावकर यांनी असोसिएशनला चांदीची गणपतीची मूर्ती भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT