nimbut Crime: 
पुणे

Baramati Crime: बैल कसा घेऊन जातो म्हणत थेट डोक्यात गोळी! रणजित निंबाळकरांचा मृत्यू, आरोपी फरार

Baramati nimbut Crime: शर्यतीच्या बैलाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून बिनसल्याने निंबुत (ता. बारामती) येथे गुरुवारी रात्री अकरानंतर घडलेल्या घटनेत रणजित एकनाथ निंबाळकर (रा. फलटण जि. सातारा) हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते.

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर: निंबुत (ता. बारामती) येथे झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले रणजित एकनाथ निंबाळकर यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. यामुळे आता गौरव काकडे व गौतम काकडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. या घटनेने बैलगाडा शर्यत क्षेत्रात दुःखद वातावरण पसरले आहे.

शर्यतीच्या बैलाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून बिनसल्याने निंबुत (ता. बारामती) येथे गुरुवारी रात्री अकरानंतर घडलेल्या घटनेत रणजित एकनाथ निंबाळकर (रा. फलटण जि. सातारा) हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना सुरुवातीला बारामतीला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडल्याने पुण्याला मोठ्या खासगी रुग्णालयात नेले. शुक्रवारी दुपारी शस्त्रक्रियादेखील झाली. मात्र शनिवारी पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

निंबाळकर हे फलटणमध्ये ज्ञानज्योती पोलीस भरती अकादमी चालवत होते. मागील वर्षी भरतीचे हँडविल वाटण्यासाठी पेडगावला गेले आणि तिथे भरलेला बैलांच्या शर्यतीचा फड पाहिला. तेंव्हापासून त्यांनी या क्षेत्रात झोकून दिले. बैलगाडा संघटनेचे नेते मानले गेलेले गौतम काकडे यांचा सर्जा हा बैल 61 लाखाला खरेदी करून ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यांच्याकडे सर्जासोबत सुंदर हाही प्रसिद्ध बैल होता. त्यामुळे लवकरच त्यांची बैलगाडा क्षेत्रातील 'सर' नावाने ख्याती झाली.

हाच 'सुंदर' नावाचा बैल खरेदी करण्यासाठी सोमवारी गौतम काकडे व संतोष तोडकर हे दोघे रणजित यांच्याकडे गेले होते. पाच लाख रूपये इसार देऊन गौतम हा बैल निंबुतला घेऊन आले होते. उरलेले ३२ लाख नेण्यासाठी गुरूवारी रात्री अकरा वाजता रणजित यांच्यासह पत्नी अंकिता, मुलगी अंकुरण, मित्र वैभव कदम, पिंटु जाधव हे चारचाकीतून निंबुतला गौतम यांच्या निवासस्थानी गेले.

यावेळी गौतम यांनी, "राहिलेले पैसे सकाळी देतो आता स्टॅम्पवर सही द्या" असे सांगितले. यावर रणजित यांनी," सगळे पैसे द्या नाहीतर इसार परत देतो. माझा बैल मला परत द्या" असे म्हटले. यानंतर बैल कसा नेतो तेच बघतो असे म्हणत गौतम यांनी शिवीगाळ केली. तर गौरव काकडे यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून रणजित यांच्या डोक्यात गोळी झाडली.

याप्रकरणी रणजित यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून गौरव काकडे, गौतम काकडे व अन्य तीन तरुणांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. रणजित यांचा मृत्यू झाल्यामुळे आता खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.

दरम्यान, गौतम काकडे व गौरव काकडे हे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष शहाजी काकडे यांचे मुलगे आहेत. शहाजी काकडे यांचा घटनेत अथवा फिर्यादीच्या तक्रारीत सहभाग नाही. मात्र पिस्तूल परवाना शहाजी काकडे यांचा असल्याने त्यांना व गौरव काकडे याना पोलिसांनी अटक केली होती. दोघांनाही बारामती न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तर गौतम काकडे फरार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Ayodhya Ram Mandir Flag : राम मंदिरात PM मोदी करणार ध्वजारोहण; सहा हजार पाहुणे होणार सहभागी, कशी आहे सुरक्षा व्यवस्था ?

Viral News : मंदिरात जाताच अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले १६ हजारांचे शूज, संतापलेल्या इंजिनिअरला पुजाऱ्याकडून मिळाले 'हे' उत्तर

Latest Marathi Breaking News : बुलढाण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

SCROLL FOR NEXT