बारामती, ता. १३ : ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०च्या अंमलबजावणीमध्ये बारामती नगरपरिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे. आतापर्यंत बारामतीत ३९५ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, लाभार्थ्यांना तीन कोटी ८८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. आणखी २८ घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी अडीच लाखांचे अनुदान अनुज्ञेय असून, त्यात केंद्राचा दीड लाख व राज्याचा एक लाख रुपयांचा हिस्सा आहे. आतापर्यंत २०८ लाभार्थ्यांना पहिला, तर १८० लाभार्थ्यांना दुसरा हप्ता प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे देण्यात आला आहे.
दरम्यान, रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत सन २०२५-२६ साठी २४ लाभार्थी प्रस्ताव मंजूर झाले असून, १२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता १२ लाख, तर सहा लाभार्थ्यांना दुसरा हप्ता सहा लाख रुपये वितरित करण्यात आला आहे.
प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्के घर मिळावे आणि शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामती नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड, प्रस्ताव सादरीकरण, मंजुरी आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. मंजूर घरकुलांचे बांधकाम सुरू होऊन लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
- पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.