Bribe  bribe
पुणे

बारामती : लाचप्रकरणी वडगाव निंबाळकरचे दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात

कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी ४० हजारांची लाच मागीतली होती.

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाणेतील हवालदार शिवाजी सातव (वय ५२) व पोलिस नाईक गोपाळ जाधव (वय ३५) यांना लाचेची मागणी केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी ४० हजारांची लाच मागीतली होती. (Two Police Case File Bribe Matter)

एका ६७ वर्षीय तक्रारदाराने यासंबंधी एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांविरोधात वडगाव पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे आली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता या गुन्ह्याचा तपास गोपाळ जाधव हे करत असल्याचे दिसून आले. तक्रादारांना अटक न करण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी या दोघांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपये व चौकीसाठी प्रिंटर घेण्यासाठी १५ हजार रुपये अशा ४० हजारांच्या लाचेची मागणी केली. ही कारवाई पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर अधिक्षक सूरज सातव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT