Police Deputy Headquarters sakal
पुणे

Baramati News : बारामतीचे पोलिस उपमुख्यालय पूर्णत्वाच्या दिशेने

बारामती जिल्ह्यातील पोलिस दलाची वेगवान हालचाल व्हावी, प्रशिक्षण व इतर मुलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ब-हाणपूर येथे उभारण्यात येत असलेल्या पोलिस उपमुख्यालयाचे काम सध्या वेगाने सुरु आहे.

मिलिंद संगई,

बारामती जिल्ह्यातील पोलिस दलाची वेगवान हालचाल व्हावी, प्रशिक्षण व इतर मुलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ब-हाणपूर येथे उभारण्यात येत असलेल्या पोलिस उपमुख्यालयाचे काम सध्या वेगाने सुरु आहे.

बारामती - जिल्ह्यातील पोलिस दलाची वेगवान हालचाल व्हावी, प्रशिक्षण व इतर मुलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने बारामतीनजिक ब-हाणपूर येथे उभारण्यात येत असलेल्या पोलिस उपमुख्यालयाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे उपमुख्यालय मंजूर करुन त्याचे काम सुरु केलेले होते. अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे विक्रमी वेळेत हे काम पूर्णत्वास जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचण्यास विलंब होतो, या साठी ब-हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल व परिस्थिती नियंत्रणात आणणे सहजतेने शक्य होईल, या उद्देशाने हे उपमुख्यालय निर्माण केले गेले.

हा होईल फायदा....

बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर या चार तालुक्यांना या उपमुख्यालयाचा फायदा होईल. मनुष्यबळ तातडीने उपलब्ध होण्यासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी या उपमुख्यालयातील पोलिस बळ महत्वाची भूमिका बजावेल. या शिवाय बारामती पाटस रस्त्यावर हे पोलिस उपमुख्यालय होणार असल्याने या रस्त्याच्या विकासासाठीही आपोआपच गती मिळणार आहे.

वेगाने काम पूर्ण करण्यावर भर...

बारामतीचे पोलिस उपमुख्यालयाचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या उपमुख्यालयाने पोलिस विभागातील प्रशिक्षणास इतरही अनेक सुविधा मिळतील, पाच तालुक्यांना तातडीच्या प्रसंगी वेगाने पोलिस बळ पाठविणे सुकर होईल.

- आनंद भोईटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती.

• 142 .62 कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामास मान्यता

• 65 एकरांच्या भूखंडावर 28 इमारती प्रस्तावित.

• सर्व इमारतींचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर

• परेड ग्राऊंडच्या किल्ला भिंतीचे बांधकाम, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ता काम पूर्णत्वाच्या मार्गावर.

• 32617 चौरस मीटरचे एकूण बांधकाम.

• शुभम ईपीसी प्रोजेक्टस प्रा. लि. काम करीत असून मे. स्टुडिओ 888 आर्किटेक्ट हे वास्तूविशारद आहेत.

या बाबी पूर्णत्वाच्या मार्गावर.....

• प्रशासकीय इमारत

• पोलिस अधीक्षक व उपअधीक्षक निवासस्थान

• सायबर पोलिस स्टेशन

• विश्रामगृह

• आर.पी.आय इमारत

• प्रशिक्षण केंद्र

• मुले व मुलींचे वसतिगृह

• बहुउद्देशिय सभागृह

• मोटार ट्रान्स्पोर्ट वर्कशॉप

• अंतर्गत रस्ते, परेड ग्राऊंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या रामकुंडात चपला आणि कपडे फेकाफेकी प्रकरणावर गुन्हा दाखल

Bribery Case Police : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ७ लाखांची लाच, खाकीला बदनाम करणाऱ्या शेख, कांबळेचा रुबाब उतरला

Bee Attack:परीक्षा संपताच विद्यार्थ्यांवर आग्या मधमाश्‍यांचा हल्ला; वाकी शिवणे येथील घटना; वाहनचालकाचा जीव धाेक्यात अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT