बारामती, ता. ४ : संकटाच्या वेळी नागरिकांनी डायल ११२वर केलेल्या प्रत्येक कॉलला तातडीने प्रतिसाद देत बारामती उपविभागातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या दोन महिन्यांत उपविभागातील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून प्राप्त झालेल्या एकूण १,००५ आपत्कालीन कॉलवर शंभर टक्के कार्यवाही करण्यात आली.
बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, भिगवण, माळेगाव व सुपा या पोलिस ठाण्यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक ५२१ कॉल बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्राप्त झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कॉल हाताळूनही या ठाण्याने सरासरी ३ मिनिटे ३६ सेकंदांत प्रतिसाद दिला.
बारामती तालुका पोलिस ठाण्याचा प्रतिसाद सर्वाधिक वेगवान असून सरासरी वेळ ३ मिनिटे १ सेकंद इतका राहिला. प्राप्त कॉलच्या अनुषंगाने केवळ घटनास्थळी पोहोचण्यापुरती कार्यवाही न करता, परिस्थितीनुसार आवश्यक मदत व कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. या कालावधीत २७ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली असून पाच प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या नियंत्रणाखाली ही प्रतिसाद यंत्रणा कार्यरत आहे.
अधिकारी, पोलिस अंमलदार, पेट्रोलिंग पथके आणि डायल ११२ प्रतिसाद पथकांमधील प्रभावी समन्वयामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. अपघात, मारामारी, गंभीर वाद, महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अथवा अन्य तातडीच्या परिस्थितीत नागरिकांनी डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बारामती उपविभागातील डायल ११२ प्रतिसाद वेळ
- बारामती तालुका : ३ मिनिटे ०१ सेकंद
- माळेगाव : ३ मिनिटे २२ सेकंद
- बारामती शहर : ३ मिनिटे ३६ सेकंद
- सुपे : ४ मिनिटे ४० सेकंद
- वडगाव निंबाळकर : ५ मिनिटे १५ सेकंद
ठळक बाबी :
- एकूण आपत्कालीन कॉल : १,००५
- सर्व कॉलवर कार्यवाही : १०० टक्के
- बारामती शहरातील कॉल : ५२१
- अदखलपात्र गुन्हे : २७
- दाखल गुन्हे : ५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.