Crime sakal
पुणे

Baramati Crime : पोलिसांकडून गावठी पिस्तूल व काडतूसे जप्त

बारामती शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरुन एका युवकाकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूसे जप्त केली.

मिलिंद संगई,

बारामती शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरुन एका युवकाकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूसे जप्त केली.

बारामती - शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरुन एका युवकाकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूसे जप्त केली.

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना गुनवडी परिसरात एम एच 42 BH 5473 या गाडीवरचा युवक दोन दिवसापासून त्याच्याकडे गावठी पिस्तूल असून तो विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. महाडीक यांनी पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह तपास पथकातील तुषार चव्हाण, दशरथ कोळेकर, दशरथ इंगोले, अजय सीताप, शाहू राणे, कल्याण खांडेकर यांना कारवाईच्या सूचना केल्या.

संशयित गाडी गुनवडी येथे नदीच्या जवळ थांबवून पोलिसांनी चालक विक्रम शरद माने (वय 23, रा. गुनवडी, ता. बारामती) याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्या नंतर त्याच्याकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली. सदर आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. संबंधित आरोपीकडून पोलिस आणखी माहिती घेत असून तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी तपासाबाबत सूचना केल्या आहेत.

पिस्तूलाबाबत ज्या नागरिकांना माहिती असेल त्यांनी पोलिसांना ही माहिती द्यावी, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT