पुणे

बारामतीच्या राजकारणात नव्या पर्वाचे संकेत

CD

बारामतीच्या राजकारणात नव्या पर्वाचे संकेत
सोमेश्वर विजयाने आगामी निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भक्कम पायाभरणी
मिलिंद संगई : सकाळ वृत्तसेवा
बारामती, ता. १४ : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने मिळवलेला दणदणीत विजय हा बारामतीच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरला आहे. तर सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या राजकारणावरील आपली पकड निर्विवादपणे सिद्ध केली आहे. या विजयाने आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांची भक्कम पायाभरणी झाली आहे.
पुरुषोत्तम जगताप यांनी अचानक बंडाचे निशाण फडकावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही काळ अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी स्वतः सूत्रे हाती घेत, जगताप यांना वगळून नवीन पॅनेलची घोषणा केली आणि संपूर्ण यंत्रणा ताकदीने कामाला लावली. बिनविरोध अपेक्षित असलेली ही निवडणूक तिरंगी झाल्याने निकालाबाबत उत्सुकता होती, पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सर्व राजकीय अटकळींना पूर्णविराम दिला.
बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या सोमेश्वरवर ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने सत्ता मिळवल्याने एक गोष्ट स्पष्ट केली की, कारखान्याचा सभासद दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान विसरलेला नाही. पुरुषोत्तम जगताप यांनी ''लक्ष्मीदर्शना''चा आरोप करत पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला असला, तरी अजितदादांविषयीची सहानुभूतीची लाट आणि सलग तेरा वर्षे अध्यक्षपद भूषवूनही पुन्हा त्याच पदावर बसण्याची जगताप यांची महत्त्वाकांक्षा सभासदांना रुचली नाही, हेच मतदानातून दिसून आले.

भाकरी न फिरवल्याचा परिणाम
"भाकरी फिरवली असती तर करपली नसती," ही एका सभासदाची प्रतिक्रिया सोमेश्वरमधील राजकीय चुकीवर अचूक बोट ठेवते. एकाच व्यक्तीला दीर्घकाळ संधी देण्याची चूक पक्षाच्या अंगाशी आली. यातून धडा घेत सुनेत्रा पवार यांनी सर्वांना समान संधी देण्याचे धोरण स्वीकारताच जगताप यांनी विरोधात पॅनेल उभे केले. मात्र, ही अनपेक्षित खेळी असूनही न डगमगता राष्ट्रवादीने संघटनात्मक बांधणीच्या जोरावर विजयश्री खेचून आणली.

आता कसोटी नव्या नेतृत्वाची
विजयानंतर आता नवनिर्वाचित संचालक मंडळापुढे सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. यंदाच्या टंचाईच्या परिस्थितीत ऊस उपलब्धता, गाळप आणि राज्यात सर्वोत्तम भाव देण्याची परंपरा कायम राखणे ही त्यांच्यासाठी एक अग्निपरीक्षाच ठरेल. आर्थिक शिस्त आणि काटकसरीचे धोरण राबवून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी या नव्या मंडळावर असेल.

सुनेत्रा पवारांची ''सायलेंट'' रणनीती यशस्वी
या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी माध्यमांपासून दूर राहत पडद्यामागे राहून अचूक राजकीय डावपेच आखले. वैयक्तिक गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांवरील जबाबदारीचे वाटप आणि पूर्णवेळ निवडणुकीत स्वतःला झोकून देत त्यांनी शांतपणे हा विजय साकारला. प्रतिस्पर्ध्याला राजकीय व्यूहरचनेत कसे नामोहरम करायचे, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले असून, या विजयाने त्यांच्या नेतृत्वगुणांवरही शिक्कामोर्तब झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

SCROLL FOR NEXT