पुणे

'बारामती पॉवर मॅरेथॉन'च्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

बारामती स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे 26 नोव्हेंबर रोजी आयोजित 'बारामती पॉवर मॅरेथॉन' स्पर्धेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

Manoj Bhalerao

Baramati Marathon: बारामती स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे 26 नोव्हेंबर रोजी आयोजित 'बारामती पॉवर मॅरेथॉन' स्पर्धेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून 26 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत शहर व परिसरातील वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

भिगवण रोडने येणाऱ्या वाहतुकीत बदलकरीता पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- रुई, सावळ, वंजारवाडी, कन्हेरी या ठिकाणाहून बारामतीकडे येणाऱ्या वाहनांनी पेन्सील चौकातून न येता पालखी महामार्गाचा वापर करुन माळावरची देवी, इंदापुर रोड मार्गे बारामती येथे यावे. बारामतीमधून भिगवणकडे येणारी वाहतूक सम्यक चौक, जैन मंदिर या ठिकाणी न येता पिंपळी लिमटेक मार्गे पालखी महामार्गे वळविण्यात येत आहे. (Latest marathi News)

देशमुख चौक, सातव चौक या ठिकाणाहून येणारी वाहतूक सम्यक चौकाकडे न येता रेल्वे उड्डाणपुलावरुन येवून पहिला टर्न मारुन वैद्यकीय महाविद्यालय, महिला रुग्णालयाकडे वळविण्यात येत आहे. बारामती विमानतळ तांदुळवाडीकडून येणारी वाहतूक पेन्सिल चौकाकडे न येता वैद्यकीय महाविद्यालयासमोरील महिला रुग्णालयाकडे रेल्वे उड्डाण पुलावरुन उजवीकडे वळून सातव चौकाकडे वळविण्यात येत आहे.

पेन्सिल चौक ते पंचायत समितीकडे येणाऱ्या नागरिकांनी दोन्ही बाजूच्या सेवा मार्गाचा वापर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT