sharad pawar esakal
पुणे

Sharad Pawar : 'टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर आयातीचा निर्णय म्हणजे शेतक-याच्या दुःखावर डागण्या' पवारांचा मोदी सरकारवर घणाघात

राज्य सरकारने शेतक-यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून संकटग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.

मिलिंद संगई,

बारामती - दुष्काळी भागात पाऊस कमी झाला आहे, बारामतीसारख्या ठिकाणी टँकर लावायची वेळ आली आहे, काही ठिकाणी लोक छावण्या काढा अशी मागणी करायला लागले आहेत, काही ठिकाणी पेरण्या झाल्या पण पाऊस नसल्याने दुबार पेरण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, शेतक-यांवर हे संकट आलेले आहे.

राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून संकटग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारला ही सूचना केली.

टोमॅटोची आयात केंद्राने केल्याच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, देशांतर्गत किंमती वाढल्यावर व शेतक-याला चार पैसे अधिकचे मिळू लागले हे दिसल्यावर आयातीची भूमिका केंद्र सरकार घेत असते. शेतक-याला चार पैसे अधिकचे मिळत असतील तर त्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्याला अधिक यातना कशा देता येईल, अशी भूमिका आजचे राज्यकर्ते घेत आहेत, टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर आयातीचा निर्णय म्हणजे शेतक-याच्या दुःखावर डागण्या देण्यासारखे आहे.

नबाब मलिक यांना आज कारागृहातून सोडण्याची शक्यता असल्याचे मला सांगितले गेले, त्या नंतर मी त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीमध्ये कसलाही संभ्रम नाही, विचाराने जे पक्ष एकत्र आले आहेत, ज्यांची भूमिका देश व राज्य पातळीवर भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही सहभाग असण्याचे कारण नाही. ही भूमिका स्पष्ट झाल्यानंतर कसलाही संभ्रम राहिलेला नाही. मी सोलापूर दौ-यातही माझी भूमिका स्पष्ट केलेली असल्याने तुम्ही पुन्हा हा प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करु नका, असे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले.

महाविकास आघाडीची बैठक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला मुंबईत हयात हॉटेलला होत असून ती आयोजित करण्यासंदर्भातील जबाबदारी मी, उध्दव ठाकरे, नाना पटोले यांनी घेतलेली आहे. ही बैठक उत्तम रितीने होईल याची काळजी आम्ही घेत आहोत.

ठाण्यातील रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांच्याच जिल्ह्यातील रुग्णालयात अशी घटना घडते, याचा अर्थ राज्य कोणत्या दिशेने निघाले आहे, याचा एक उत्तम नमुना बघायला मिळाला. हे चित्र दुरुस्त करण्यासाठी कठोर व तातडीची पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही.

राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर करुन ईडीच्या नोटीसा पाठवल्या जात आहेत. जयंत पाटील यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे पण विचारांच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मणीपूरचा विषय महत्वाचा होता.

चीनच्या सीमारेषेवरील या प्रदेशातील लोकांच्या यातना असतील, त्याकडे केंद्र लक्ष देत नसेल तर देशासाठी चिंताजनक गोष्ट आहे. त्या मुळे सातत्याने हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला पण त्यावर चर्चाच घडवून आणली नाही. पंतप्रधानाच्या भाषणात याचा जुजबी उल्लेख होता, दिलासा देण्यासाठी सक्तीच्या भुमिकेचा अभाव होता, त्या मुळे काहीही पदरात पडलेला नाही.

लोकांचा प्रचंड प्रतिसाद....

कालच्या सोलापूर दौ-याला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला, ठिकठिकाणी लोक मला भेटून प्रतिसाद देत आहेत. मंगळवारी ना.धो. महानोर यांच्या पळसखेडला जाऊन कुटुंबियांना भेटणार आहे. त्या नंतर बीडला मी जाहीर सभा घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT