Rain esakal
पुणे

Baramati : संततधार पावसाने बारामतीचे जनजीवन पार विस्कळीत...

सकाळ पासून पावसाची चालू असलेली संततधार या मुळे होणारी वाहतूक कोंडी

मिलिंद संगई, बारामती

बारामती : संततधार पावसाने बारामतीचे जनजीवन आज पार विस्कळीत झाले. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु असल्याने छत्री व रेनकोटशिवाय बाहेर पडलेल्या बारामतीकरांना भिजण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.

प्रारंभी पावसाची भुरभुर होती, मात्र नंतर पावसाने चांगलाच जोर धरला. नवरात्राच्या पहिल्या माळेचे स्वागत आज वरुणराजाने केले. सोमवारचा दिवस असल्याने सकाळपासूनच लोकांची कामासाठी बाहेर पडण्याची लगबग सुरु होती, मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे काही वेळातच रस्त्यांवरची गर्दी रोडावली. पितृपंधरवड्यामुळे गेले काही दिवस बाजारपेठेतही काहीशी हालचाल मंदावली होती, आजपासून खरेदीला प्रारंभ होईल अशी व्यापा-यांची अपेक्षा होती, मात्र संततधार पावसाने आजचा दिवसही थंड गेला.

वाहतूकीच्या कोंडीने बारामतीकर त्रस्त.....

दरम्यान पावसाची संततधार व प्रशासकीय भवन चौकापासून ते कारभारी सर्कलपर्यंत ट्रक व अवजड वाहनांच्या वाहतूकीसह बसेसच्या वाहतूकीमुळे आज वाहतूकीची अनेकदा कोंडी झाली. पावसामुळे पोलिसही रस्त्यावर नसल्याने पावसात दुचाकीस्वारांचे हाल झाले. वास्तविक बसस्थानक कसब्यात हलविल्यानंतर वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी या परिसरात कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. वाहतूकीचे योग्य समन्वयन होत नसल्याने बारामतीकरांना कोंडीत वेळ व्यतित करावा लागत आहे.

शहरातील चौकात अनेकदा वाहतूक कोंडी होते, वाहतूक पोलिसांची उपस्थिती गरजेची असून त्यांच्याकडून वाहतूकीचे समन्वयन व्हावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसाने बारामतीकरही आता त्रासून गेले असून हा पाऊस लवकर थांबावा अशी लोकांची प्रार्थना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT