Baramati Rain sakal
पुणे

Baramati News : बारामतीत समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त...

टंचाईग्रस्त जळगाव कडे पठार, का-हाटी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

बारामती - तालुक्याच्या अनेक भागात गुरुवारी (ता. 21) कमी अधिक प्रमाणात वरुणराजाने हजेरी लावली. टंचाईग्रस्त जळगाव कडे पठार, का-हाटी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले होते. अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गुरुवारी तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे सर्वाधिक म्हणजे 104 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल जळगाव सुपे येथे 92 तर का-हाटीमध्ये 40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालेला असला तरी ज्या दमदार पावसाची शेतक-यांना प्रतिक्षा आहे, तसा पाऊस अजूनही बरसत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.

तालुक्यातील सुपे येथे 1 जून पासून 21 सप्टेंबर पर्यंत म्हणजे जवळपास 112 दिवसात अवघा 54 मि.मी. पाऊस झालेला आहे. पळशी 32, जराडवाडी 40, गाडीखेल 68, चौधरवाडी 70, सायंबाची वाडी 77, नारोळी 80, चांदगुडेवाडी 84 मि.मी. इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.

टंचाईचे तीव्र सावट बारामती तालुक्यावर असून दमदार पाऊस न पडल्यास रब्बीचा हंगाम तर हातातून जाईलच मात्र त्याचा आगामी काळातील पिकांवरही विपरीत परिणाम होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

मिलिंद संगई, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT