अपघात  sakal
पुणे

बारामती : सुप्यात हॉटेलमध्ये ट्रक घुसून एक ठार, तीन जखमी

चौफुला-मोरगाव मार्गावर सोंड परिसरातील वळणावर हा अपघात झाला.

जयराम सुपेकर, सुपे

सुपे : सुपे (ता.बारामती) येथील एका हॉटेलात मालट्रक घुसून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला.या अपघातात रूकसाना दिलावर काझी (वय ४५, राहणार सुपे, ता.बारामती) यांचा ट्रकखाली सापडल्याने मृत्यू झाला. तर दिलावर इस्माईल काझी (वय ५०) सोयल दिलावर काझी (वय २५) दोघेही राहणार सुपे, ता.बारामती) हे किरकोळ जखमी झाले असून, मुजाईद अली अहमद अली सय्यद (राहणार बिजनोर, ता.धामपूर, उत्तर प्रदेश) यांच्या हाताचे हाड मोडून गंभीर जखमी झाले आहेत.

सुप्यातून जाणाऱ्या चौफुला-मोरगाव मार्गावर सोंड परिसरातील वळणावर हा अपघात झाला. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार युन्नूस इब्राहिम काझी यांनी फिर्याद दिली. साखर भरलेला ट्रक क्रं. एमएच १६ सीसी ६१२३ मोरगावच्या दिशेने भरधाव चालला होता. वळणावर उलटून थेट हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात झाला. अपघातानंतर दारूच्या नशेत असलेला ट्रक चालक हनुमंत भालके (राहणार निलंगा) पूर्ण नाव पत्ता माहित नाही. हा पसार झाला त्याचा शोध चालू असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात झाला त्यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे जवळच थांबले होते. ते म्हणाले - वेगात असलेला हा ट्रक काही कळायच्या आत उलटून मोठा आवाज झाला. अपघाताची स्थिती पाहून तातडीने चौफुल्यावर जाऊन क्रेन आणली. तो पर्यंत सुप्यातील रणजीत खैरे यांनी जेसीबीच्या सहाय्याने व काही तरूणांनी ट्रकमधील साखरेची पोती बाहेर काढली. या वेळी शौकत कोतवाल, राहुल भोंडवे, पोपट खैरे आदींसह ग्रामस्थांनी मदत केली. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT