शाळेतील साहित्याची चोरी; चोरटे निघाले गावातलेच
शाळेतील साहित्याची चोरी; चोरटे निघाले गावातलेच Sakal
पुणे

बारामती : शाळेतील साहित्याची चोरी; चोरटे निघाले गावातलेच

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : मुढाळे ता. बारामती येथील जिल्हा परिषद शाळेतील कॉम्प्युटर आणि शालेय पोषण आहाराची भांडी चोरणारे चोरटे गावातलेच निघाले. दोन महिन्यापुर्वी मंगळवार ता. १४ सप्टेंबर २०२१ शाळेचे कुलूप तोडून चोरट्यांनी शाळेतील कॉम्प्युटर आणि शालेय पोषण आहाराची भांडी चोरून नेली होती याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना बारामती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार येथील राजेंद्र जाधव व त्याचे इतर साथीदारांनी मिळून चोरी केली आहे. जाधव यास ताब्यात घेऊन घरफोडी बाबत विचारपूस केली असता गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी राजेंद्र मारुती जाधव, लक्ष्मण मल्हारी सकाटे, राहुल वसंत सकाटे सर्व रा. मुढाळे ता. बारामती यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडुन चोरलेला ऐवज ताब्यात घेउन गजाआड केले. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप येळे, रविराज कोकरे, आसिफ शेख, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT