पुणे

बारामतीत इमारतीवरून उडी घेतलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

CD

बारामती, ता. ४ : शहरातील भिगवण रस्त्यावरील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याने १६ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परीक्षेच्या तणावातून तिने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, बारामती शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
संबंधित विद्यार्थिनी बारामतीतील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. अभ्यास होत नसल्याने व परीक्षेचे दडपण येत असल्याचे ती आई-वडिलांना सांगत होती. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर टेरेसवर जाते असे सांगून ती गच्चीवर गेली. बराच वेळ ती परत न आल्याने वडील तिला पाहण्यासाठी गेले असता, तिने टेरेसच्या कठड्यावरून अचानक खाली उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत तिला बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र शुक्रवारी (ता. ४) पहाटे पाचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीच्या पालकांनी सध्या कोणाविरुद्धही तक्रार केलेली नाही. यापूर्वीही ती घरातून निघून गेल्याची नोंद असल्याने पोलिस त्या बाबीचीही पडताळणी करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय माहिती तसेच शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींचे जबाब घेऊन पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : वाद, चर्चा थांबवा, उत्सवाकडे लक्ष केंद्रित करा, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांना सूचना

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT