पुणे

बारामतीत टायर चोरीचा अवघ्या तासाभरात छडा

CD

बारामती, ता. ५ : शहरातील फलटण रस्त्यावरील ‘मिश्रीलाल डिस्ट्रीब्युटर्स’ या टायर विक्री दुकानातून ५१ हजार रुपये किमतीचे ब्रीजस्टोन कंपनीचे आठ टायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या तासाभरात या चोरीचा छडा लावत दोन संशयितांना ताब्यात घेतले.
तेजस मनोज मुधा (वय ३५, व्यवसाय टायर विक्री) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ३ ऑक्टोबर रोजी दुकानाच्या टेरेसवरील उघड्या दरवाजातून चोरट्याने प्रवेश केला. त्याने आठ टायर चोरून नेले. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक टेळकीकर, हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर व हवालदार सादिक काझी यांनी तपास करून रणजित विलास पवार (वय ३२, रा. कुरुबकर नर्सरी शेजारी, बारामती) व इरफान मणी तांबोळी (वय २२, रा. फलटण रस्ता, लहूजी नगर, बारामती) यांना ताब्यात घेतले. चोरीस गेलेला मुद्देमाल, या गुन्ह्यातील अन्य व्यक्तींचा सहभाग तसेच आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT