बारामती, ता. ३ : शैक्षणिक संस्थांच्या शंभर यार्ड परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर बारामती शहर पोलिसांनी ‘कोटपा’ (सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा) कायद्यांतर्गत कारवाई केली. बुधवारी (ता. २) राबविलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम, निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान बुधवारी (ता. २) फातिमानगर, जगतापमळा येथील ‘मुस्कान टी हाउस’ येथे तपासणी केली असता, कारभारी धों. आ. सातव शाळेच्या प्रतिबंधित परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळले. याप्रकरणी गनीभाई बाबुलाल शेख (वय ६१) यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. पोलिस शिपाई संतोष हनुमंत वीरकर यांनी फिर्याद दिली. त्यानंतर खंडोबानगर येथील ‘अमोल पान शॉप’वर कारवाई करून एका महिलेवर खटला दाखल करण्यात आला. पोलिस शिपाई शंकर बाळासाहेब निंबाळकर यांनी फिर्याद दिली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक विलास मोरे, महिला पोलिस हवालदार रेश्मा काळे, महिला पोलिस शिपाई वनिता कदम, शंकर निंबाळकर, संतोष वीरकर व सविता पंडित यांनी सहभाग घेतला.
कारवाईचा इशारा
१८ वर्षांखालील व्यक्तींना तसेच शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.