Vipul Shaha sakal
पुणे

Vipul Shaha : बारामतीच्या विपुल शहा यास अमेरिकेत 'सोलराईझ' पुरस्कार

बारामती तालुक्यातील पणदरे येथील विपुल अभय शहा याला सोलराईज पुरस्कार जाहीर झाला.

मिलिंद संगई,

बारामती - तालुक्यातील पणदरे येथील विपुल अभय शहा याला 'सोलराईज' पुरस्कार जाहीर झाला असून अमेरिकेत 23 ते 25 मे दरम्यान होणा-या तीन दिवसीय मेळाव्यात त्याला तो प्रदान केला जाणार आहे. दरम्यान लॉसएंजलिस व कॅलिफोर्निया येथेही त्याला आमंत्रित करण्यात आले आहे.

अमेरिकेतील एम. आय. टी. विद्यापीठातून स्थापित झालेल्या 'प्रेजेंसिंग इन्स्टिट्यूट' तसेच 'अशोका चेंजमेकर' या संस्थेने जगभरातून 80 लोकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.

जगभरातील निरनिराळ्या धार्मिक तसेच आध्यात्मिक तत्वांचा आधार घेऊन सामाजिक परिवर्तन कसे साधता येईल हा या मेळाव्याचा प्रमुख विषय असणार आहे.

या पुरस्कारासाठी निवड करताना विपुल यांची शिक्षण तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरी, त्यांचा विपश्यना ध्यान व बुद्ध शिकवणीतून विकसित झालेले मनोविज्ञान, गांधीनीती तसेच योगाभ्यास व जैन धार्मिक वारसा या सर्वांचा विचार घेण्यात आला.

आधुनिक युगामध्ये मानवजातीला भेडसावत असलेल्या सामाजिक, राजकीय तसेच पर्यावरणीय प्रश्नांची उत्तरे प्राचीन भारतीय संस्कृती व तत्वज्ञानातून भेटू शकतात असा विश्वास विपुल यांना वाटतो. हा पुरस्कार म्हणजे भारतीय तत्वज्ञान व संस्कृती विषयी पाश्चिमात्य जगामध्ये वाढत चाललेल्या आदर भावनेचे प्रतीक आहे असेही त्यांनी व्यक्त केले.

'अध्यात्म आणि युवा विकास' या विषयावरील त्यांचा अनुभव व विचार मांडण्यासाठी विपुल यांना या चर्चासत्रामध्ये आमंत्रित केले आहे. विपुल यांनी यापूर्वी 'टीच फॉर इंडिया' तसेच जे. कृष्णमूर्ती यांचा शाळांमध्ये काम केले आहे.

या पुरस्कार कार्यक्रमानंतर विपुल हे 'न्यू मेक्सिको' येथील एका युवा शिबिरामध्ये सामील होणार असून, ध्यान व बुद्धिविकास (neuroscience) यावर रिसर्च करणाऱ्या काही अमेरिकन वैज्ञनिकांचीदेखील भेट ते घेणार आहेत. स्वातंत्र्य सैनिक आजोबा व त्यांनी लहान वयात केलेल्या धर्मसंस्कारांमुळे हा पुरस्कार मिळाल्याचे विपुल यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

SCROLL FOR NEXT