पुणे

जीवन प्राधिकरणाला जाब विचारा

CD

बारामती, ता. २३ : शहरातील पाणीटंचाईच्या मुद्यावर बारामती नगरपरिषदेच्या मंगळवारी (ता. २३) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास लक्ष्य करीत त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारावा, अशी मागणी केली.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साठवण तलावांची रचना पाणीटंचाई भासू नये, यासाठी केली होती. मात्र, साठवण तलावांना मोठ्या प्रमाणात गळती असूनही गेल्या दोन तीन वर्षात दुरुस्तीच झाली नाही. त्यामुळे पाणी वाया जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
प्रचंड पाणीगळती सुरू असूनही जीवन प्राधिकरणाला याची विचारणाच होत नाही, याबद्दलही नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. शहरातील गावठाणात हातपंप किंवा विंधनविहिरींची सोय नसल्याने नगरपरिषद प्रशासनाने तातडीने टँकर द्यावे अशी मागणी काही नगरसेवकांनी केली.
तसेच, दुसरीकडे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदारांकडून रस्ते खोदाई केली जाते. रस्ते खोदल्यानंतर त्याची दुरुस्ती नीट होत नाही. त्यामुळे नागरिकांची नाराजी नगरपरिषद प्रशासन व नगरसेवकांना सहन करावी लागते. त्यामुळे यात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

SCROLL FOR NEXT