बारामती, ता. १५ : नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे बारामती शहरासह रुई आणि बारामती ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. शनिवार (ता. १७) पर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यानंतर रविवारपासून (ता. १८) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत हे नियोजन लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागातील पाणीपुरवठा बंद राहण्याच्या दिवसाची नोंद घेऊन आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पिण्यासाठी व दैनंदिन गरजांसाठी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
रविवारी (ता. १८) या भागांत पाणीपुरवठा बंद
म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, हंबीर बोळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, पतंगशाहनगर, मेडद रोड, क्षत्रियनगर, श्रवण गल्ली, कोष्टी गल्ली, तांदुळवाडी वेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसाब गल्ली, कचेरी रोड, बयाजीनगर, गावठाण, साईनगर, ग्रीन पार्क, संपूर्ण रुई भाग
सोमवारी (ता. १९) या भागांत पाणीपुरवठा बंद
संपूर्ण कसबा, फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजीनगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर आणि नवीन मोरगाव रोड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.