पुणे

पतीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न; पत्नीला कोठडी

CD

बारामती, ता. ७ :  पतीला बेशुद्ध करून, क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला सोमवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या अमानुष कृत्यामागील कारणांचा पोलिस कसून तपास करत आहेत.
शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला. प्रवीण प्रकाश जगताप (वय ४१) यांना त्यांची पत्नी शर्मिला हिने आधी बेशुद्धीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्यांच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, घरातील गॅलरीत पाण्याच्या टाकीसाठी बांधण्यात येत असलेल्या विटांच्या डक्टमध्ये त्यांना टाकून कायमचे संपवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला ११२ क्रमांकावर या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या प्रवीण जगताप यांना रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती," याच म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
"आम्ही पोहोचायला थोडा जरी उशीर झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता," अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम आणि निरीक्षक चिवडशेट्टी यांनी दिली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रूममध्ये... बॉलिवूड हिरोच्या पत्नीने मागे लावली डिटेक्टिव्ह; झाले धक्कादायक खुलासे

Karanja Crime : गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Marathi News Live Updates : शेतातील झोपडीत रंगला जुगाराचा अड्डा, गुन्हे शाखेच्या छापा, नऊ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT