पुणे

प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला बेड्या

CD

बारामती, ता. ४ : धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी जयेश बाळासाहेब माने याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता ७ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
जामदार रस्त्यावरील ग्रीन सिटी परिसरात २५ ऑक्टोबरला सुमीत संतोष सोनवणे (वय २१) याला जयेश माने, सोमा यादव व प्रतीक यांनी जबरदस्तीने चारचाकीत बसवून नेले. तेथे रिव्हॉल्वरसदृश शस्त्राचा धाक दाखवत धमकी दिली. तसेच कोयत्याने केलेल्या हल्ल्यात सुमीतच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ३ नोव्हेंबरला खंडोबानगर येथील काठियावाडी चहाच्या दुकानाजवळ सापळा रचला. पळून जाणाऱ्या जयेशला पोलिस शिपाई सागर जामदार यांनी पाठलाग करून पकडले. पोलिस शिपाई अक्षय सिताप यांनी गोपनीय माहिती मिळवली होती. जयेश मानेविरुद्ध २०२४ मध्ये गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७) याच्या खुनाचा, तर २०२५ मध्ये शस्त्र अधिनियमांतर्गत बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम, परिविक्षाधीन उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झाली. उपनिरीक्षक विजय टेळकीकर, हवालदार रामचंद्र शिंदे, शिपाई सागर जामदार व अक्षय सिताप यांनी सहभाग घेतला. पुढील तपास विजय टेळकीकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT