बारामती, ता. ९ : हरित ऊर्जेच्या वापराला चालना देत ‘आत्मनिर्भर कुटुंब, आत्मनिर्भर राष्ट्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. बारामती परिमंडळातील ३९ हजार ३९७ सौर ग्राहकांचे मागील जुलै महिन्यातील वीजबिल शून्य आले आहे. या ग्राहकांनी एका महिन्यात तब्बल १ कोटी २६ लाख ७२ हजार युनिट सौरऊर्जेची निर्मिती केली आहे, असे महावितरणने सांगितले.
वीजबिल शून्य झालेल्या ग्राहकांमध्ये सोलापूर मंडळातील २१ हजार १३२ ग्राहकांचा समावेश असून, त्यांनी एका महिन्यात ७२ लाख ११ हजार युनिट वीज निर्मिती केली. सातारा मंडळातील १२ हजार १६२ ग्राहकांनी ३४ लाख ६२ हजार युनिट, तर बारामती ग्रामीण मंडळातील ६ हजार १०३ ग्राहकांनी १९ लाख ९८ हजार युनिट सौरऊर्जेची निर्मिती केली आहे.
घरगुती ग्राहकांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अथवा स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेचा लाभ घेऊन घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अत्यल्प खर्चात सौर प्रकल्प
• दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसाठी लाभार्थी हिस्सा : २,५०० रुपये
• आर्थिकदृष्ट्या दुर्बल एससी-एसटी ग्राहकांसाठी : ५,००० रुपये
• सर्वसाधारण ग्राहकांसाठी : १०,००० रुपये
• एक किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसविण्याची सुविधा
• पात्रतेसाठी घरगुती वीज ग्राहक असणे आवश्यक
• ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मासिक वीज वापर १०० युनिट किंवा त्यापेक्षा कमी असावा
दृष्टिक्षेपात
३९,३९७ - वीजबिल शून्य झालेले सौर ग्राहक
१.२६ कोटी - एका महिन्यात निर्मित सौरऊर्जेची युनिट
२१,१३२ - सोलापूर मंडळातील ग्राहक
१२,१६२ - सातारा मंडळातील ग्राहक
६,१०३ - बारामती ग्रामीण मंडळातील ग्राहक
सूर्यघर योजनेतील अनुदान
• १ किलोवॅट : ३० हजार रुपये
• २ किलोवॅट : ६० हजार रुपये
• ३ किलोवॅट किंवा अधिक : ७८ हजार रुपये
• १ किलोवॅटसाठी आवश्यक जागा : सुमारे १०८ चौरस फूट
• दररोज अपेक्षित वीजनिर्मिती : ४ ते ५ युनिट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.