Marriage sakal
पुणे

बारामतीच्या इतिहासातील पहिला शून्य कचरा लग्नसोहळा

आजवर अनेक प्रकारचे विवाहसोहळे आपण पाहिले मात्र आज बारामतीत एक अनोखा विवाहसोहळा बारामतीकरांनी अनुभवला.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : आजवर अनेक प्रकारचे विवाहसोहळे (Marriage) आपण पाहिले मात्र आज बारामतीत एक अनोखा विवाहसोहळा बारामतीकरांनी (Baramati) अनुभवला. बारामतीच्या इतिहासात प्रथमच शून्य कचरा लग्नसोहळा आज पार पडला.

बारामती नगरपालिकेचे कर्मचारी सचिन खोरे यांनी आपल्या विवाहसोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा उत्सर्जित होणार नाही याची काळजी घेत एक वेगळा आदर्श घालून दिला. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन खोरे यांनी स्वताःच्या लग्नसोहळ्यात एक वेगळा पायंडा पाडला.

या लग्नात केवळ शून्य कचरा उत्सर्जित होण्यास प्रतिबंध करण्यात आला नाही तर लग्नसोहळ्याला उपस्थित मान्यवरांना स्वच्छतेची शपथही दिली गेली. प्लॅस्टिकचा वापर तसेच कागदी ग्लास किंवा प्लेटचाही वापर केला गेला नाही. प्लॅस्टिक विरहीत असा हा विवाहसोहळा केला गेला.

एकीकडे मंगलाष्टके व दुसरीकडे स्वच्छतेची शपथ देत सचिन खोरे यांनी आपला विवाह ख-या अर्थाने वेगळा केला. बारामती नगरपालिकेच्या वतीने महेश रोकडे यांनी कार्यभार स्विकारल्यापासून स्वच्छतेबाबत विशेष उपाययोजना सगळीकडे सुरु आहेत.

याच पार्श्वभूमीवर लग्नाच्या माध्यमातूनही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. महेश रोकडे यांच्यासह आरोग्य सभापती सूरज सातव यांच्या हस्ते स्वच्छतादूत प्रमाणपत्र आणि देशी वृक्ष भेट देत सचिन खोरे व कुटुंबियांचा सत्कार केला गेला.

प्लॅस्टिक हद्दपार करण्याचा प्रयत्न....

या पुढील काळात सर्वच मंगल कार्यालयांमधील प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याबाबत संबंधितांना विनंती करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकनिर्मूलन हा स्वच्छता मोहिमेतील सर्वात महत्वाचा घटक आहे. कचरा विलगीकरणासोबतच प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे.

– महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT