बारामतीकरांनी अनुभवला महाबळेश्वरचा फील.... sakal
पुणे

बारामतीकरांनी अनुभवला महाबळेश्वरचा फील....

आज हवा कोरडी असल्याने दाट धुक्याचा अनुभव बारामतीकरांनी घेतला

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : अगदी काही फूटांवरचेही दिसणार नाही इतके दाट धुके पडलेले दव हवेतील आर्द्रता आणि कुंद वातावरण आज सकाळी लवकर घराबाहेर पडलेल्या बारामतीकरांना आपण महाबळेश्वरमध्ये तर नाही ना असाच फील आला. दोन दिवसांच्या अवकाळी पावसानंतर हवेत कमालीचा गारठा आला आहे, आज हवा कोरडी असल्याने दाट धुक्याचा अनुभव बारामतीकरांनी घेतला.

काल मुसळधार पावसाने बारामतीकरांची दाणादाण उडवली होती, तालुक्यात अनेक ठिकाणी गारठा व पावसाने शेळ्या मेंढ्या दगावल्याने शेतक-यांचे नुकसान झाले आहे. हिवाळा सुरु झाल्याची चाहूल लागत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेतील गारठा कमालीचा वाढला. काल आणि आज सकाळीही बोचरी थंडी बारामतीकरांनी अनुभवली.

आज सकाळी घराबाहेर पडल्यानंतर सुरवातीला हवेत धूर आहे की काय असा भास होत होता मात्र नंतर हे धुके असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. अगदी रस्त्यापर्यंत धुक्याचे लोट येऊन पोहोचल्याने अनेकांनी या धुक्याचा वेगळा अनुभव घेतला. बारामतीत सहसा इतके दाट धुके पडत नाही. उष्ण कटीबंधातील प्रदेश म्हणून बारामतीची ओळख असतानाच आता अवकाळी पाऊस, गारठा आणि बदललेले वातावरण याचा फटका पिकांनाही बसत आहे.

आज सकाळी दृश्यमानता अगदीच नगण्य असल्याने अगदी समोरचेही अंधुक दिसत असल्याने वाहनचालकांनाही सावकाश गाड्या चालवाव्या लागल्या. बारामती नगरपालिकेचे पथदिवे लवकर बंद होत असल्याने पहाटे फिरायला जाणा-या तसेच प्रवासानिमित्त बाहेर निघालेल्यांना अंधारातूनच मार्गक्रमण करावे लागते. पहाटे लवकर बंद होणारे आणि संध्याकाळी उशीरा सुरु होणा-या पथदिव्यांच्या टायमरमध्ये बदल करण्याबाबत नगरपालिकेस वारंवार आवाहन करुनही ऋतुनुसार बदल होत नसल्याची लोकांची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT