baramati  sakal
पुणे

Baramati : बारामतीच्या नवीन बसस्थानकाचे उदघाटन पुढील महिन्यात होणार

आगामी महिन्यात बारामतीतील अत्याधुनिक बसस्थानक, ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व पोलिस गृहनिर्माण वसाहत या तीन भव्य वास्तूंचे उदघाटन घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : आगामी महिन्यात बारामतीतील अत्याधुनिक बसस्थानक, ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व पोलिस गृहनिर्माण वसाहत या तीन भव्य वास्तूंचे उदघाटन घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामतीत जवळपास 50 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक व सुसज्ज बसस्थानक अजित पवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आले आहे. एखादया विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक असून या मुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. बारामतीनजिक ब-हाणपूर येथे पुणे पोलिस मुख्यालयावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस उपमुख्यालय वसविण्यात आले आहे. अत्यंत आधुनिक इमारती, प्रशिक्षण केंद्र, परेड ग्राऊंड व निवासस्थाने उभारण्यात आली आहेत.

बारामती शहर, तालुका व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचा-यांसाठी तब्बल 196 निवासस्थाने असलेल्या सात अत्याधुनिक इमारती पोलिस लाईनच्या परिसरात उभारण्यात आलेल्या आहेत.

या तिन्ही इमारती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. आज पाहणी दौ-याच्या वेळेस अजित पवार यांनी हे सूतोवाच केलेले असून प्रशासन आता त्या दृष्टीने तयारीला लागले आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे उदघाटन घ्यायचे असल्याने या आठवड्यात याच्या तारखा निश्चित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : महत्त्वाची बातमी! शिक्षकांना नोकरी वाचविण्यासाठी 'टीईटी'च्या सहा संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिली 'या' तारखेपर्यंत मुदत

"मी देवाचे आभार मानले" AI च्या धक्कादायक अनुभवावर आर्या आंबेकर झाली व्यक्त ; म्हणाली...

IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना 'महाराष्ट्राचे अशोक खेमका' का म्हणतात? काय आहे त्यांचा रेकॉर्ड?

Ujjain Adventure Tourism: 10000 फुटावरून घ्या महाकाल मंदिराचे दर्शन, उज्जैनमध्ये स्काईडाइविंग फेस्ट, जाणून घ्या A टू Z माहिती

IND vs SA : भारताच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या अन् गौतम गंभीर यांच्यात झाला वाद? ड्रेसिंग रूमच्या Viral Video ने चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT