sidhi pavar 
पुणे

बारामतीची सिद्धी घेणार पंतप्रधानांसोबत चांद्रयान लॅंडिंगचा अनुभव 

मिलिंद संगई

बारामती शहर (पुणे) : येथील विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेची विद्यार्थिनी सिद्धी विश्वंभर पवार हिने "इस्रो'च्या ऑनलाइन प्रश्‍नमंजूषा कार्यक्रमात यश प्राप्त केले आहे. त्यामुळे तिला येत्या सात सप्टेंबर रोजी "इस्रो'च्या बंगलोर येथील नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बसून चांद्रयान मोहिमेच्या लॅंडिंग क्षणाचा अनुभव घेता येणार आहे. 

"इस्रो'ने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जाणीव जागृती वाढविण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रश्‍नमंजूषा आयोजित केली होती. यामध्ये पाच मिनिटात 20 प्रश्‍नांची अचूक उत्तरे देऊन सिद्धी पवार हिने 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रातून जिंकण्याचा मान मिळवला. या प्रश्नमंजुषामध्ये उत्तम गुण मिळवणारी ती राज्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. शाळेमार्फत देण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे तिला या प्रश्‍नमंजूषाची माहिती मिळाली होती. या यशामुळे तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांद्रयान 2 लॅंडिंगचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी मिळणार आहे. 

संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ऍड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त ऍड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज व शाळेचे प्राचार्य आशिष घोष यांनी सिद्धी पवार हिचे अभिनंदन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT