Atharv Jadhav Sakal
पुणे

बारामतीचा अथर्व जाधव खेळणार राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत

बारामती येथील अथर्व जितेंद्र जाधव यांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.

मिलिंद संगई,

बारामती - येथील अथर्व जितेंद्र जाधव (Atharv Jadhav) यांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी (National Cricket Competition) निवड झाली आहे. अथर्व जाधव हा बारामतीत क्रिकेट शिकणारा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू असून त्याने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट लीगमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

नँशनल क्रिकेट लिग या स्पर्धेमध्ये 16 वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून अथर्व याने स्थान प्राप्त केले आहे. लहानपणापासूनच अथर्व याला क्रिकेटची आवड होती, त्याला त्याच्या आई वडीलांनी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यातून तो शास्त्रशुध्द पध्दतीने क्रिकेट खेळणयास शिकला.

राष्ट्रीय क्रिकेट लीग स्पर्धेसाठी निवड होणारा अथर्व जाधव हा बारामतीतील पहिलाच खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तीनही पातळ्यांवर तो अष्टपैलू आहे. त्याच्या खेळाची दखल घेत त्याला राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रिकेट लीग हे एक युवक क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे, ज्या खेळाडूंना मध्ये क्रिकेट खेळण्याची आवड आहे व ते कौशल्य दाखवतात अशा खेळाडूंना या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून बारामतीचे नाव क्रिकेट विश्वात अग्रेसर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अथर्व जाधव यांनी दिली आहे. त्याला आगामी काळात या संधीमुळे आयपीएलमध्ये देखील सराव चाचणी साठी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचे वडील जितेंद्र जाधव हे बारामीतीस श्रायबर डायनामिक्स डेअरीमध्ये प्रकल्प प्रमुख आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT