लोगो : बार्शी नगरपरिषद
---
BAR26B13099
---
प्रभागातील विकासासह झाडांची संख्या वाढवणार
बार्शी : माझ्या प्रभागासह शहरातील इतर प्रभागांत देखील झाडांची संख्या वाढवून पर्यावरण कसे समतोल राखले जाईल याचा प्रामुख्याने मी प्रयत्न करणार आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते, बंदिस्त गटारी, रस्ते, दिवाबत्ती, स्मारके आणि उद्याने अशी कामे झाली आहेत. तरीही अनेक ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत, तर काही कामे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. जास्तीत जास्त झाडे लावून निसर्गाशी समतोल राखण्याचा प्रयत्न राहणार आहे. अनेक ठिकाणी बंदिस्त गटारींचे काम सुरू असून, ती देखील कामे पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्ते हे खड्डेमुक्त केले जाणार आहेत. तर प्रभागातील अनेक गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून त्यांना घरकुले देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या होत असल्याने पोलिसांशी संपर्क साधून त्यावरही मात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. येत्या काही दिवसांतच माझा प्रभाग इतर प्रभागांपेक्षा कसा सुंदर आणि स्वच्छ राहील, याकडे मी प्राधान्याने लक्ष देणार आहे.
- विजय राऊत, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद
---
BAR26B13097
---
प्रभागातील सामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार
बार्शी : प्रामुख्याने बार्शी शहराच्या उत्तर भागातील माझा प्रभाग आहे. हा संमिश्र लोकवस्तीचा प्रभाग आहे. सध्या प्रभागात कामे झाली असली तरी अनेक ठिकाणी सिमेंट, डांबरी रस्ते, बंदिस्त गटारी, पथदिवे आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची कामे प्रलंबित आहेत. उरलेली सर्व कामे प्राधान्याने मी करणार आहे. प्रभागात शासकीय योजनांमधून अनेक प्रकारची विकासकामे आहेत, ती प्राधान्याने करून सर्व सोयींनीयुक्त सुंदर प्रभाग करणार आहे. अनेक ठिकाणी गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांचे वास्तव्य देखील आहे. त्यांना रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुले देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागातील दिव्यांग व्यक्तींसाठीही त्यांना नगरपालिकेमार्फत देण्यात येणारी पेन्शन योजना सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. तरुणांसाठी प्रभागात सुसज्ज अशी व्यायामशाळा अथवा अत्याधुनिक जिमखाना उभारण्याचे स्वप्न आहे. लहान मुले आणि खास करून महिलांसाठी देखील विरंगुळा म्हणून क्रीडांगण अथवा उद्यान निर्माण करण्याचे माझे प्रयत्न आहेत.
- वसंत देवकर, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.