पहिला पेपर गेला सोपा
बार्शी शहर, ता. २० : दहावी परीक्षेची बार्शी शहरातील ७ केंद्रातून २ हजार ७५५ तर ग्रामीण भागातील ११ केंद्रातून ३ हजार ९८, असे एकूण ५ हजार ८५३ विद्यार्थी बसले आहेत. शुक्रवारी मराठी विषयाचा पेपर विद्यार्थ्यांनी दिला. पहिलाच पेपर सोपा गेल्याने अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. पहिल्या दिवशी परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसून येत होता.
जिल्हा परिषद कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तेथून सर्व परीक्षा केंद्रावर ऑनलाइन नजर ठेवली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा शांततामय वातावरणात व सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बार्शी तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.