पुणे

बार्शीत विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी

CD

बार्शी न.प.च्या विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी
भाजप-शिवसेनेचे वर्चस्व; स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्षा कथले
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ३१ : बार्शी नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. नगरपरिषदेत भाजपकडे बहुमत असल्याने सर्व समित्यांवर भाजप व शिवसेनेचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. स्थायी समितीच्या सभापतिपदी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांची निवड करण्यात आली.
मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रत्येक विषय समितीत एकूण १२ सदस्य असून, त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे ७ तर विरोधी पक्षाच्या ५ सदस्यांचा समावेश आहे.
स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांची निवड झाली असून, या समितीत भाजपचे विजय राऊत, शिवसेनेचे संदेश काकडे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कृष्णराज बारबोले यांना स्थान देण्यात आले आहे.
अर्थ व नियोजन समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, समितीत लक्ष्मीबाई गव्हाणे, चंद्रकला कांबळे, राजू घोंगाने या सत्ताधारी नगरसेवकांसह राहुल कोंढारे, विद्या बंगाळे व सरस्वती भानवसे यांचा समावेश आहे.
बांधकाम समितीच्या सभापतिपदी दीपक राऊत यांची निवड झाली आहे. या समितीत प्रकाश माने, स्वप्नील उघडे, कांचन मोहिते या सत्ताधारी नगरसेवकांसह नागेश अक्कलकोटे, राहुल कोंढारे व मुज्जमील पठाण या विरोधी नगरसेवकांनाही स्थान देण्यात आले आहे.
शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतिपदी भारत पवार, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतिपदी अमोल चव्हाण, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी संतोष बारंगुळे यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी आबेदा तांबोळी तर उपसभापतिपदी सुनीता ढोणे यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT