BAR26B14068
बार्शी : आगळगाव जवळील धनगरवाडीत सुरू असलेल्या रेड्यांच्या टकरी.
टकरीत ‘मोहन किंग’ रेड्याचा मृत्यू
आगळगावात टकरींचे आयोजन; प्राणीमित्रांसह नागरिकांमधून संताप
बार्शी, ता. १७ : बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे रविवारी (ता. १५) येथील धनगरवाडी परिसरात रेड्यांच्या टकरी घेण्यात आल्या. यामध्ये बार्शी शहरातील ‘मोहन किंग’ नावाच्या रेड्याचा टकरीदरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीमित्रांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परंपरेच्या नावाखाली मनोरंजनासाठी मुक्या जनावरांना एकमेकांसमोर उभे करून त्यांच्या संघर्षाचा आनंद लुटला जातो. त्यात एखाद्या प्राण्याचा जीव गेला तरी त्याची पर्वा केली जात नाही. ही कोणती माणुसकी, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. बंदी असतानाही अशा टकरींचे आयोजन झालेच कसे? असा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात रेड्यांच्या टकरींवर कायदेशीर बंदी असताना आगळगावात हजारो लोकांच्या उपस्थितीत अशा टकरींचे आयोजन नेमके कसे झाले? या आयोजनाला पोलिस प्रशासनाची परवानगी होती का? परवानगी नसेल तर प्रतिबंधित प्रकार उघडपणे सुरू असताना प्रशासनाला त्याची माहिती कशी मिळाली नाही? माहिती असूनही दुर्लक्ष झाले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेची पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आयोजकांची ओळख पटवावी, संबंधितांवर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी प्राणीमित्रांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.