BAR26B12892
बार्शी शहर : येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद देताना विद्यार्थी.
...........
‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेस बार्शीत भरघोस प्रतिसाद
............
‘महाराष्ट्र’, ‘सिल्व्हर’ अन् ’सुयश’मध्ये शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती
.........
सकाळ वृत्तसेवा
............
बार्शी शहर, ता. १८ : ‘सकाळ’ एनआयईतर्फे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी बार्शी शहरातील सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि सुयश विद्यालयाच्या प्रांगणात शेकडो विद्यार्थ्यांनी विविध रंगछटांमधून आपले कलाविष्कार दाखविले. शहरातील तीनही केंद्रांवर उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर कलाशिक्षक नितीन मोहिते यांच्या संकल्पनेतून सुंदर आणि आकर्षक असे ‘सकाळ’ नाव कोरले होते. त्यातूनच त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राचा जागर केला. मैदानावरच्या मोठ्या ‘सकाळ’ अक्षराभोवतीच विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून बसस्थानक, निवडणुकीचा प्रचार, ऐतिहासिक स्थळ पहायला गेलेली मुलांची सहल, रस्सीखेच, गणेशोत्सव मिरवणूक अशी चित्र रेखाटत आपल्या कला गुणांना मुले वाट मोकळी करून देत होती.
महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के. डी. धावणे, सिल्व्हर ज्युबिलीचे मुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी, सुयश विद्यालयाच्या अलका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच शाळेतील कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिल्व्हर जुबली हायस्कूलच्या हिरव्यागार गालिचावर आणि रंगमंचावर विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भरघोस प्रतिसाद नोंदवला. महाराष्ट्र विद्यालयातील सुमारे ३५० च्यावर तर सिल्वर ज्युबिलीच्या ३०० आणि सुयश विद्यालयाच्या १०३ अशा बार्शी शहरात एकूण ७६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सर्वच गटात ऑनलाइन स्पर्धेत देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र विद्यालयाचे कलाशिक्षक नितीन मोहिते, श्री पाटील, श्री जगदाळे, सुयश विद्यालयाच्या वर्षा साखरे, अश्विनी नांदवटे, यांच्यासह सिल्व्हर हायस्कूलमधील श्री ऐनापुरे, हेमंत गाढवे, मनगिरे, गजभार यांनी मुलांकडून चित्रे रंगवून घेतली. शहरातील तीनही केंद्रांमधून विद्यार्थ्यांसह पालकांनीही ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत भरभरून प्रतिसाद दिला. तसेच ‘सकाळ’ च्या या उपक्रमाबद्दल अनेक शिक्षकांनी पालकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.