Barsu Refinery Protest & Ajit pawar sakla
पुणे

Barsu Refinery Protest : समृध्दी मार्गातही तक्रारी होत्या पण...रिफायनरी प्रकरणावरून अजित पवार काय म्हणाले ?

या प्रकल्पाबाबतही विकासाच्या प्रकल्पांना आमचा विरोध नाही, मात्र या कामामुळे पर्यावरणाचा -हास होता कामा नये, पर्यावरणवाद्यांशीही गरज असल्यास सरकारने बोलावे, तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असेल तर प्रश्न मार्गी लावावा.

मिलिंद संगई, बारामती..

Barsu Refinery Protest- बारसू रिफायनरी प्रकरणात सरकारने आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून घ्यायला हवी, विकासकामांना आमचा कधीच विरोध नव्हता व नसेलही मात्र मुस्कटदाबी करुन चालणार नाही, चर्चेतून मार्ग काढावा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोलून दाखविली.

बारामतीत आज ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत तेथीलजनतेशी सरकारने संवाद साधायला हवा. समृध्दी मार्गाबाबतही अनेकांच्या तक्रारी होत्या, मात्र त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्यात आले. एनरॉनच्या बाबतही असाच विरोध झाला होता.

या प्रकल्पाबाबतही विकासाच्या प्रकल्पांना आमचा विरोध नाही, मात्र या कामामुळे पर्यावरणाचा -हास होता कामा नये, पर्यावरणवाद्यांशीही गरज असल्यास सरकारने बोलावे, तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असेल तर प्रश्न मार्गी लावावा.

तथ्य नसेल तर त्यांना समजून सांगावे, योग्य मोबदला द्यावा, सरकारने यात समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहे. सरकारने या प्रकरणी आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: राहुल गांधींविरोधातील याचिकेवर CJI सूर्यकांत वकिलावर संतापले; अचानक सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद!

Tiger Shroff Firing: लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या! साबरमती जेलमधील ‘दो सौ खोली’ हलविले

Pune Graduate election counting latest update : पुणे पदवीधर मतदार संघातील पहिली अपडेट आली समोर, लिंबू, बिबवे आढळल्याने गोंधळ

गुलाल आपलाच! मतमोजणी सुरू होताच कराळे मास्तरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाले, ४०-४५ हजार मते मिळतील

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लोकशाही भवनात मतमोजणी सुरू; १४ टेबलवर १४ हजार मतपत्रिकांची मोजणी

SCROLL FOR NEXT