पुणे

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला पाटबंधारे खात्याने दाखवली केराची टोपली

आदम पठाण

वडापुरी - इंदापूर तालुक्यातील वाघाळे पाझर तलाव व वडापुरी येथील पाझर तलावात नीरा डावा कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडावे असा जिल्हाधिकाऱ्यांचा लेखी आदेश 24 जानेवारी रोजी पाटबंधारे खात्याला देण्यात आला होता. परंति, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला पाटबंधारे खात्याने केराची टोपली दाखवली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांनी सांगितले.

तांबीले पुढे म्हणाले, वाघाळे तलावात व वडापुरी येथील पाझर तलावात पिण्यासाठी पाणी सोडावे यासाठी चार ते पाच वेळा जिल्हा परिषद सदस्य रोहित पावार यांच्या मार्गदर्शना खाली या परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो. सतत केलेल्या पाठ पुराव्यामुळे त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी वडापुरी आणि वाघाळे तलावात पाणी सोडावे असा आदेश पाटबंधारे खात्याला दिले होते. परंतु, पाटबंधारे खात्याने वाघाळे तलावात पाणी सोडले व वडापुरी येथील तलावात पाणी सोडले नसल्याने आज वडापरी गाव पाण्यापासून वंचित राहिले असल्याने पाण्याची पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली असल्याचे तांबीले यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा जिल्हाधिकार्‍यांना वाघाळे पाझर तलाव व वडापुरी येथील पाझर तलावात पाणी सोडावे अशी मागणी केली होती. तरीसुद्धा या पाझर तलावात पाणी सोडले सोडले नसल्यामुळे या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ संतप्त झाले असल्याचे तांबीले यांनी सांगितले.

सध्या फीडिंग संपले असून आवर्तन चालू झाले आहे. त्यामुळे जमिनी भिजल्यानंतर हे पाणी वरती असलेल्या भागाकडे गेल्यामुळे वडापुरी तलावात पाणी आले नाही. पुढे तांबिले म्हणाले, वडापुरी येथे दुष्काळी परिस्थितीमुळे जर टॅंकर वरती हजारो रुपये खर्च करावे लागत आहे. ते वाचविण्यासाठी या पाझर तलावात पाणी सोडणे गरजेचे असताना पाणी सोडले नसल्यामुळे या पाजर तलाव पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT