parvati1.jpg 
पुणे

मूर्खपणाचा कहर! चक्क पिण्याच्या पाण्याच्या टाकीत `ते` करतायेत अांघोळ

सागर कुलकर्णी

पर्वती  (पुणे) : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहेत. परंतु, काही ठिकाणी नागरिक कोरोनाची कोणतीही तमा न बाळगता अजब प्रकार करत आहेत. ग्रीनमध्ये राहिलेल्या जनता वसाहतीत नुकतेच 14 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात आता अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरीदेखील जनता वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अंघोळ करण्याचा अजब प्रकार घडत आहे. 

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जनता वसाहतीत काळजी घेण्यात आली होती. परंतु याच ठिकाणी आता बाधित रूग्ण सापडलेले असताना देखील चक्क पिण्याच्या पाण्याच्या टाकीतच अंघोळ करण्याचे प्रकार घडत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जनता वसाहतीच्या वरच्या बाजूला टेकडीवर वसाहतीसाठी पाण्याची टाकी बसवलेली आहे. याद्वारे संपूर्ण वसाहतीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, सध्या या टाकीमध्ये या भागातील काही मुले रोज अंघोळ केल्याचे दिसून येत आहे.

पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार घडल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. याठिकाणी गेली एका वर्षापासून कुठलाही कर्मचारी देखरेखीसाठी नसल्याचे दिसून येत आहे. अंघोळ केलेले पाणी नागरिकांनी प्यायचे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता राखण्याची गरज असताना असे प्रकार याठिकाणी घडत आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. जी मुले या टाकीमध्ये अंघोळ करतात यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सध्या होत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी- क्लिक करा

 

"या भागातील काही मुले टेकडीवरील या पाण्याच्या टाकीत अंघोळ करतात. नागरिकांनी हेच पाणी प्यायचे का महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
संदीप काळे, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पर्वती सामाजिक न्याय विभाग 

 

अधिकाऱ्यांशी बोलून या लोकांचा बंदोबस्त केला जाईल. 
-तुकाराम पवार, महापालिका अधिकारी, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT